हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे सांगून प्रौढ बेपत्ता; जिल्हापेठ पोलीसात नोंद !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील गाडोदा गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्ती हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे सांगून गुरूवारी १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपासून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आला आहे. जगन मश्चिंद्र सोनवणे वय ५५ रा. गाडोदा ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील गाडोदा गावात जगन सोनवणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. गुरूवारी १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात असल्याचे सांगून ते बेपत्ता झाले. त्यानंतर ते घरी परतले नाही, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत खबर दिली. त्यानुसार शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहे.