कळमसरे, ता.अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळ कळमसरे येथील एका ४३ वर्षीय प्रौढाचा आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सूरत येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कळमसरे येथील हिरामण साहेबराव महाजन (हल्ली मुक्काम सुरत) या एका ४३ वर्षीय प्रौढाचे आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास उष्माघातने निधन झाले आहे.
हिरामण याची घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने ते बारा ते पंधरा वर्षेपासून कामानिमित्त सुरत गुजरात येथेच होते. आज दुपारी त्याची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता रस्त्यातच त्याची प्राणजोत मावळली.
त्याचा मृत्यू उष्माघातने झाला असावा असा अहवाल तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिला आहे. त्यांची अंतयात्रा उद्या दि. ८ मे रोजी कळमसरे येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ते येथील दुर्गा टी.स्टॉलचे संचालक रामलाल महाजन यांचे पुतणे तर अनिल उर्फ नाना महाजन व समाधान महाजन यांचे भाऊ होत.