आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी इंग्रजी शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागामार्फत शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 व वर्ग 2 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आदिवासी बांधवांनी (दि.११) पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी केले आहे.

या संदर्भात एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील राहणाऱ्या अनुसुच‍ित जमातीच्या आदिवासी पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळामध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता २रीच्या वर्गात प्रवेशिका मिळवयाची असेल सदर योजनेचा लाभ घ्यावा,  आवश्यक त्या कागदपत्रासह दि.३ ते ११ फेब्रुवारी२०२२ या कालावधीत विनामुल्य अर्ज स्विकारून दि.१५ मार्च २०२२ च्या सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी केले आहे .

हे कागदपत्रे आवश्यक 

दरम्यान, पालकांनी योजनेचा घेत आपल्या पाल्यांची प्रवेशिका मिळवण्यास ईच्छुणाऱ्यांनी अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला यादीतील अनुक्रमांक नमुद असलेला ग्रामसेवकाचा दाखला, पालकाच्या कुटुंबाचा वार्षीक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख या मर्यादेत असावे, इयत्ता १ली साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबर २o२२ रोजी ६ वर्ष पुर्ण असावे, त्याचा जन्म १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान झालेला असावा.

इयत्ता २रीच्या वर्गात प्रवेशासाठी सदर विद्यार्थी सन २०२१ ते २२ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बॉनाफाईड अर्जासोबत जोडावे, विद्यार्थ्याचे आधार कार्ड हे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे पालक हे शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत. तरी या योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्याचा असेल अशा पालकांनी १५ मार्च २०२२ पुर्वी संबधित कार्यालयात अर्ज सादर करावा.

सदरच्या इयत्ता १ली व इयत्ता २रीच्या प्रवेशासाठीच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी दि. २३ मार्च २०२२ रोजी बालमोहन विद्यालय चोपडा, शिव कॉलनी, शिरपुर रोड चोपडा या ठिकाणी उपस्थित राहावे. यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर,  बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील प्रवेशिका मिळवू ईच्छुक पालकांनी व पाल्यांनी दि.२३ मार्च २०२२ रोजी शासकीय आश्रमशाळा  डोंगरकठोरा तालुका यावल जिल्हा जळगाव असे आवाहन जिल्हा आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.

 

 

 

Protected Content