जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील आजी-माजी सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव येथील मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
या वसतिगृहात युद्ध विधवा, माजी सैनिक विधवा आणि माजी सैनिक अनाथ पाल्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येत आहे. एकूण जागांपैकी १५% जागा आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, तर उर्वरित जागांवर इतर नागरिकांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाईल.
अधिक माहितीसाठी, इच्छुक पालक संजय रा. गायकवाड (सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मो. नं. ८४५९६८७३८८, दूरध्वनी क्र. ०२५७-२२४१४१४) किंवा समाधान धनगर (अशासकीय वसतिगृह अधीक्षक, मो. नं. ७३७८९४२३२७, दूरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८) या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.