यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंदाच्या मे महीन्यात तापमानाने उचांक काठल्याने जळगाव जिल्ह्यासह सलग पाच दिवस यावल तालुक्यात देखील ४५ अंश सेल्सिअस असे तापमान वाढलेले असतांना या तापमानाच्या निकषात जळगाव जिल्ह्यातुन जवळपास ५१ महसुली मंडळाचा समावेश करण्यात आले असुन मात्र यावल तालुका हा डावलला गेल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कमी जास्त प्रमाणात दाखवण्यात आलेल्या तापमानाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला असुन याबाबत आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी या संदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घेत केळी उत्पादकांना न्याय मिळून द्यावे अशा मागणीचे निवेदन फैजपुर विभागाच्या प्रांत अधिकारी देवयानी यादव यांना दिले आहे. यावेळी प्रांत अधिकारी कार्यालयाच्या कनिष्ठ लिपिक ज्योती सुरवाडे यांनी निवेदन स्विकारले असून डॉ. कुंदन फेगडे यांच्या सोबत मनवेल येथील केळी उत्पादक शेतकरी उदयभान पाटील व आदी उपास्थित होते, दरम्यान केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ न मिळाल्यास प्रसंगी आपण न्यायलयात दाद मागणार असल्याचे डॉ कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे .