फैजपूरातून एकाची दुचाकी लांबविली

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील सरस्वती नगरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मिलींद सुधाकर सरोदे (वय-४२) रा. सरस्वती नगर, फैजपूर ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे (एमएच १९ सीजी २३७१) क्रमांकाची दुचाकी आहे. रविवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सोमवारी २४ जानेवारी रोजीसकाळी ८ वाजता उघडकीला आले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कोठेच आढळून आली नाही. मिलींद सरोदे यांनी फैजपूर पोलीसा सकाळी ११ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र मोरे करीत आहे.

 

Protected Content