जामनेर तालुक्यात मतदान सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज

voting symbol

जामनेर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदारसंघामधील मतदान शांततामय वातावरणात आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे चोख तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाची सर्व सज्जता पुर्ण झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी आज (दि.१९) एका पत्रकार परीषदेत दिली.

 

जामनेर मतदारसंघासाठी एकुण ३२५ मतदान केंद्रांची निर्मीती करण्यात आली असुन, सुमारे १६०० कर्मचारी, ३१ झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान व्यवस्थेसाठी ४८ बसेस व २६ क्रूझर आदी वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. यातील बहुतांश वाहनात जी.पी.एस. सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिला मतदारांसाठी एक स्वतंत्र मतदान केंद्र, तर दिव्यांगांसाठीही व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असुन त्यासाठी ३०९ पोलीस कर्मचारी, एक उपआधिक्षक दर्जाचा अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, नऊ सहायक पोलीस निरीक्षक आणी १२३ गृहरक्षक दलाचे जवान व राज्य राखीव पोलीस दलाचे ५० जवान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय २४ तारखेला होणारी मतमोजणी शहरातील जळगाव रोडवरील शासकीय गोदामामध्ये केली जाणार असल्याचेही मते यांनी यावेळी सांगीतले.

Protected Content