जामनेर मिनी मंत्रालयात भ्रष्टाचार ; गिरीश महाजनांकडून कान उघडणी

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यात मिनी मंत्रालयात काम करण्यासाठी नागरिकांना पैशांची देवाणघेवाण करावी लागते आणि याठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले. यावरून माजी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संबधीत विभागातील कर्मचारी अधिकारी यांची कान उघडणी करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या पंचायत समितीच्या माध्यमातून राबवुन ग्रामीण भागातील लाभार्थी नागरिकांना याचा लाभ मिळवुन दिला जातो. मात्र जामनेर समितीत याचा विरोधाभास पहावयास मिळत ग्रामीण भागातुन आलेल्या लाभार्थ्यांना कर्मचारी, विस्तार अधिकारी ते थेट गटविकास अधिकारी यांना लाच देवुन आपले काम करून घ्यावे लागत आहे. यावर आज पंचायत समिती कार्यालयात माजी मंत्री महाजन यांनी बैठक बोलवुन संबधीत विभागातील कर्मचारी अधिकारी यांची कान उघडणी कारवाईचा इशारा यावेळी दिली आहे, असे देखील यावेळी महाजन यांनी सांगितले आहे.

तसेच आता असले प्रकार कानावर आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही. महाजन यांनी पंचायत समिती कार्यालयात येणारे बहुतेक नागरिक किंवा लाभार्थी हा अशिक्षित असतात. ते त्यांचा रोजगार बुडवुन तुमच्याकडे येतात त्यांच्या शकांचे निरसन योग्य पद्धतीने न सोडवाता तुम्ही त्यांची पैशांसाठी अडवणूक करतात. कार्यालयाच्या आवारात दलाल, एजटांचा वाढता वावर याकडे गटविकास अधिकारी या लक्ष का देत नाही. याचा गांभीर्याने विचार करावा लागणार अशा शब्दात संताप व्यक्त करत असे प्रकार कदापी खपवुन घेतले जाणार नाही. 

मुख्यतः घरकुल, शौचालय व ग्रामपंचायत या विषयी पंचायत समिती सदस्य यांनी नाराजी दाखवत कर्मचारी आम्हाला सांगतात की गट विकास अधिकारी यांना सिंचन विहिरी, घरकुल, व शौचालय प्रकरणात पैसे द्यावे लागतात. तसे कॉल रेकॉर्डसुद्धा असल्याचे विलास पाटील यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असुनही कर्मचारी अधिकारी यांचा मनमानी पणाने चाललेल्या भ्रष्ट काराभाराला आवर घालण्यासाठी बैठक लावण्याची नामुष्की येवुन ठेपली. हा चितंनाचा विषय आहे.

 

Protected Content