आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधान

adity rahul

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीत एकमेकांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील सत्तेची घडी व्यवस्थित बसल्यानंतर आता या दोन नेत्यांची भेट एकमेकांच्या भुवया उंचावणारी आहे.

 

आदित्य ठाकरे हे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. कालच त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या हेडकॉर्टरला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या होत्या. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्या वेळी आदित्य यांनी राहुल गांधी यांची भेट झाली नव्हती. दरम्यान, आदित्य यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Protected Content