रस्त्यावरच घडविली ‘अद्दल’ : येवती येथे विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओला चोप!

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील येवती येथे विद्यार्थींनीचा पाठलाग करणाऱ्या रोडरोमिओला भर रस्त्यावर विद्यार्थींनींनी चपलांनी चांगलेच चोपले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला बोदवड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थींनी या रोज जामठी येथे दोन किलोमीटर पायी चालत शाळेत जातात. दरम्यान तालुक्यातील बेटावद खुर्द येथील मुलगा बापू दुमाले हा दररोज मुलींना त्रास देत होता. या संदर्भात विद्यार्थींनींनी शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली होती. दरम्यान हा मुलगा शाळेतील नसल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थीनींनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानुसार पालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान मंगळवारी १५ मार्च रोजी ६.४५ वाजेच्या सुमार सर्व विद्यार्थींनी ह्या शाळेत नेहमीप्रमाणे जात असतांना पालकांच्या मदतीने सापळा रचना. त्यावेळी हा मुलगा बापू दुमाले हा मुलींसमोर येताच पालकांनी त्याला पकडले. त्याला शाळेत हजर करून विद्यार्थींनींनी चपलांनी चांगलाच चोप दिला जेणे करून भविष्यात मुलींची छेड काढण्याचा प्रकार होणार नाही. यानंतर पालकांनी मुलाला बोदवड पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.

Protected Content