Home क्राईम महादेवनगरातील कुटुंबावर प्राणघातक हल्ला; चार जणांना अटक

महादेवनगरातील कुटुंबावर प्राणघातक हल्ला; चार जणांना अटक

0
36


जळगाव (प्रतिनिधी) । आम्हाला बघून गाडी हळू केल्याचा रागातून एका कुटुंबियांवर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की,  तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेव नगर भागातील रहिवाशी संजय बाबुलाल जैन (वय-५७) यांचा मुलगा महावीरने रस्त्यात खड्डा असल्याने त्याने मोटारसायकल हळू केली. त्याच वेळी समीर शेख शफी (वय २२), बिसमिल्ला शेखर शफी (वय-२०),  अरबाज शेख शर्फी  तिनही रा. दूध फेडरेशन, राज मालकी नगर आणि शोएब शेख साबीर (वय-१८), रा. महादेव नगर कानडदा रोड यांनी महावीर यास ‘मला पाहून गाडी हळू केली’ असे म्हणत शिवीगाळ सुरु करुन मारहाण करण्यास सुरूवा केली. मारहाणीत झाटपटी झाल्यात त्यात महावीरने कशीबशी आपली सुटका केली व घरी पळ काढला. त्यानंतर चारही आरोपींनी जैन यांच्या घरी जावून  कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला.  हल्लेखोरांनी किराणा दुकानातील मालाची नासधूस केली. तसेच घरातील महिलानाही मारहाण केली.  तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे हे आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाल्याने हल्लेखोर तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. संजय जैन यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.


Protected Content

Play sound