रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी भागातील जनतेसाठी निःस्वार्थ सेवा बजावणारे सहस्त्रलिंग-लालमाती गृप ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक राजेंद्र सायबु तडवी यांना जिल्हा परिषदेच्या वतीने “आदर्श ग्राम सेवक पुरस्काराने” गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे प्रदान करण्यात आला.
राजेंद्र तडवी हे मागील १६ वर्षांपासून आदिवासी भागात सेवा देत आहे. आदिवासीवासी भागात सेवेकरी म्हणून काम करणारे व पुरस्कार प्राप्त पहिले ग्राम सेवक आहे.ज्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. २००८ मध्ये तामसवाडी येथे सेवाकार्याची सुरुवात करून, त्यानंतर श्री तडवी अप्पा यांनी बक्षीपुर येथे प्रभारी ग्राम सेवक म्हणून काम केले आहे. त्यांनी प्रत्येक गावात आपल्या कामाची अमिट छाप सोडली आहे.
ग्रामसेवक राजेंद्र तडवी यांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता.त्यांनी सुशिक्षित आणि शिक्षित परिवार आहे.श्री तडवी अप्पा यांनी लग्नानंतर पत्नी कोमल तडवी यांना शिक्षण देऊन शिक्षिका बनविले.त्यांचे मुले मोहसीन तडवी बीएससी जिओलॉजी आणि सुहेल तडवी बीएससी अॅग्रीकल्चर मधून उच्च शिक्षण घेत आहे. आदर्श ग्राम सेवक पुरस्कार प्राप्त श्री तडवी यांची इच्छा आहे की प्रत्येक मागास समाजातील गरीब मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे.आणि पुढे जाऊन समाजाचे आणि देश्याचे नावलौकिक करावे.
राजेंद्र तडवी यांनी २०१४ ते १६ मध्ये सिंदखेडा, तर प्रभारी चार्ज कुसुंबा सेवा दिली आहे.त्या नंतर २०१६ ते १९ मध्ये आभोडा, आणि २०१९ पासून सहस्त्रलिंग- लालमाती गृप ग्राम पंचायत व लोहारा येथे प्रभारी चार्ज ग्राम पंचायत येथे सेवा बजावत आहे. सर्वत्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. कोरोना काळात त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे लालमाती येथे एकही रुग्ण नव्हता. त्यांनी क्वारंटाईन झोन, सॅनिटायझर वाटप, गावात फवारणी, मास्क वितरण, आणि १००% लसीकरण यांसारख्या उपाययोजना राबवल्या.
तडवी यांच्या नेतृत्वाखालील गावांनी हगणदारीमुक्त गाव म्हणून ओळख मिळवली आहे. त्यांनी स्वयंरोजगारावर आधारित प्रशिक्षण, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना यांसारख्या योजनांचा उत्कृष्ट अंमल केला आहे. पाणी टंचाईवर त्यांनी वेळेचे नियोजन करून गावाला दिलासा दिला. आदिवासी बांधवांसाठी पेसा अंतर्गत तेंदू पत्ता व डिंग यांचे संकलन चांगल्या प्रकारे करण्यात आले.
ग्राम पंचायत शाळांसाठी डिजिटलायझेशनचे मोठे काम केले आहे, ज्यामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. गावाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करून हिरवळ निर्माण केली आहे. ग्राम पंचायत कर वसुलीसाठी कँप राबविले आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळवून दिला आहे. शांत स्वभावाचे राजेंद्र तडवी म्हणतात की, “हा पुरस्कार माझा नसून गावांमध्ये केलेल्या कामांच्या माध्यमातून समाज माध्यमांनी माझ्या कामाची दिलेली पावती आहे. पुढे यापेक्षा जास्त कामे गावाला समृद्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.” पुरस्काराबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.