अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारचा अपघात; एक मजूर ठार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वाहनास अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक कामगार ठार तर दोन ठार झाले आहेत. ही घटना मुंबई येथील कांदिवली पोइसर मेट्रो स्थानक परिसरात शुक्रवारी रात्री घडली. प्राप्त माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ज्यामध्ये स्वत: उर्मिला कानेटकर (कोठारी) आणि त्यांचा वाहनचालकही जखमी झाला आहे. या अपघातातील पीडित मेट्रो कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

उर्मिला कोठारे कानेटकर यांच्या वाहनाचा अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुंबईतील समता नगर पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघात घडला त्या मेट्रो स्थानकाजवळून या कारने कामगारांना धडक दिली. ही घटना घडली त्या वेळी कार भरधाव वेगाने जात होती. दरम्यान, “कारच्या एअरबॅग उघडल्याने उर्मिला कानेटकरचा जीव वाचवला”, असे एका पोलीस सूत्राने सांगितले, अपघाताच्या तीव्रतेमुळे वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले.

उर्मिला कानेटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. जे दुनियादारी, शुभमंगल सावधान आणि ती साध्या के करते यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांच्याशी विवाह केला आहे.

Protected Content