मुंबई वृत्तसंस्था । शोले चित्रपटातील ओळखीचा चेहरा आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे मुंबईत निधन झाले आहे. सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट व निर्माता सिद्धार्थ काक यांच्या त्या पत्नी आहेत. गीता यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या होत्या.
गीता सिद्धार्थ काक यांचे काल दि.१४ डिसेंबर रोजी निधन झाले. गीता काक यांनी बॉलिवूडमध्ये ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘राम तेरी गंगा मैली’ आणि ‘नूरी’ सारख्या सिनेमात काम केले होते. गीता सिद्धार्थ काक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात गुलझार दिग्दर्शित परिचय सिनेमातून झाली. याशिवाय १९७३ मध्ये आलेल्या ‘गरम हवा’ या सिनेमातील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक करण्यात आलं. ७० आणि ८० च्या दशकात गीता यांनी अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. यात ‘गमन’ (१९७८), ‘सदगति’ (१९८१), ‘शौकीन’ (१९८२), ‘देश प्रेमी’ (१९८२), ‘अर्थ’ (१९८२), ‘मंडी’ (१९८३) आणि ‘निशान’ (१९८३) सिनेमे केले.