जामनेर प्रतिनिधी | सत्ताधारी शिवसेनाचे पाचोरा पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांच्यासह लोहारा वरखेडी सावखेड या गावातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी आमदार गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.यामुळे मोठा पाचोरा तालुक्यात शिवसेनेला धक्का बसला आहे.
जामनेर येथील आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात आमदार गिरीश महाजन, अमोल शिंदे, जि प सदस्य मधुकर पाटील, संजय पाटील, बन्सीलाल पाटील, संजय पाटील यांच्या उपस्थितील पाचोरा येथील शिवसेना नेते व पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांच्यासह सावखेडा येथील सरपंच समाधान जनार्धन वाघ ग्रामपंचायत सदस्य संजय सोनवणे, गणेश परदेशी, अनिल पाटील, विका चेअरमन ईश्वर परदेशी, विकास सोसायटी सदस्य गोकुळ पाटील, पुंडलिक धोबी, रमण पाटील, खंडू पाटील, सुभाष परदेशी, गजानन पाटील, बैरागी तडवी, धोंडू गायकवाड, योगेश पाटील
वरखेडी येथील विजय सोनार, चंद्रकांत सोनार, कैलास सोनार, दुर्गादास सोनार, कोमल सोनार, लोहारा येथील रमेश लिगायत, मधुसूदन भंगाळे, राजू लिगायत, प्रकाश देशमुख, उमेश देशमुख, रमेश रोकडे, गजानन पाटील, बाळू कोळी आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.