अमळनेर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (दि.२३) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर सर्व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष केला आहे.
त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, रणजित पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, मुसरी शेख, आरिफ पठाण, पप्पूभाऊ कलोसे, देविदास देसले, प्रशांत भदाणे, करीम शेख, इमरान खाटीक, काजल शेख, बाळू पाटील, संभाजी पाटील, युवक काँग्रेस शहराध्यक्ष निलेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, निनाद शिसोदे, दर्पण वाघ, शुभम पाटील, अनिरुद्ध शिसोदे, कल्पेश गुजराथी, यतीन पवार, अमोल पाटील, पंकज पाटील, उमेश पाटील, असिफ पिंजारी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.