Home क्राईम गावठी कट्ट्यासह दहशत निर्माण करणाऱ्या तरूणावर कारवाई

गावठी कट्ट्यासह दहशत निर्माण करणाऱ्या तरूणावर कारवाई

0
164

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात गावठी कट्टा बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी, २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त केला आहे. याप्रकरणी शनिवारी, ३ मे रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबा शहरातील साई सिटी परिसरात चेतन वसंता देऊळकर (वय २२) नामक तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तात्काळ पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी २ मे सायंकाळी ७ वाजता सापळा रचून संशयित आरोपी चेतन देऊळकर याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळून २० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चेतन वसंत देऊळकर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.


Protected Content

Play sound