अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । झामी चौकातून अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या पॅजो रिक्षावर अमळनेर पोलीसांनी गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता कारवाई करत पकडले आहे. याप्रकरणी पहाटे ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील झामी चौकातून मध्यरात्री ॲपेरिक्षातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीसांना कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीसांनी गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता कारवाई करत एका विनाक्रमांकाच्या पॅजो रिक्षावर कारवाई केली. वाहनाची तपासणी केली असता यात वाळू आढळून आले. पोलीसांनी वाहनजप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबर उज्ज्वल कुमार म्हस्के यांनी दिलेल्या फियादीवरून वाहनचालक भावेश वासुदेव महाले वय २० रा. माळीवाडा, अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.