गांजाचा नशा करणाऱ्या तिघांवर कारवाई; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील बगीचा परिसरात अवैध गुंगीकारक असलेला गांजाचा नशा करणाऱ्या तीन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी २५ जून रोजी दुपारी ४ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता तिघांवर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरून परिसरातील बगीचा वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण हे मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरणारा गांजा हा चिलमच्या माध्यमातून नशा करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २५ जून रोजी दुपारी ४ वाजता धडक कारवाई केली. या कारवाईत संशयित आरोपी शेख मशरूम शेख अब्दुल कादिर वय-४२, रा. गवळीवाडा, वसीम शेख तलत मेहबूब वय-३९ रा. शनिपेठ आणि फैयाज शेख शमशू वय-३६ रा. तांबापुरा, जळगाव या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून नशा करणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील, रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content