महिलेचे बंद घर फोडून अडीचा लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे महिलेचे बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि २ लाख १० हजारांची रोकड असा एकुण २ लाख ४९ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी ६.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक असे की, मिनाबाई संतोष पडवडकर वय ४१ रा. तळेगाव ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून त्या आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपासून त्यांचे घर बंद होते. दरम्यान, घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बंद घराच्या दरवाजाचे कूलूप तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेली २ लाख १० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ४९ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी शुक्रवार ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला आहे. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अखेर सायंकाळी ६.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.

Protected Content