दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई; वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर पोलीसांनी केलेल्या वाहनाच्या तपासणीत रात्री एका वाहनातून विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करतांना आढळून आले. याप्रकरणी वरणगा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राष्ट्रीय महामार्गावरील मुक्ताई रोडवरील जय बजरंग ढाब्याजवळ रात्री ११.२० वाजेच्या सुमारास गस्त घालत असतांना सिल्वर कलर असलेली ओमनी वाहनाची पोलीसांनी चौकशी केली. त्यात वाहनामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्यात. वाहतूक करण्याचे परवाना पोलीसांनी मागितले असता वाहनातील चालक संतोष नारायण जैस्वाल यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सोबत असलेले दिनेश मनोहर माळी आणि रविंद्र गायकवाड (पुर्ण नाव माहित नाही) यांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले. दरम्यान १ लाख १० हजार ९२० रूपये किंमतीचा विदेशी दारूचा साठा आणि वाहन पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्ररी. पोलीस अधिक्षक नितीन गणपुरे करीत आहे.

 

Protected Content