भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बसस्थानकाजवळ परिसरात चिलम मध्ये गांजाचे सेवन करणाऱ्या एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शनिवारी २४ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरातील एका भींतीच्या आडोश्याला काही जण चिलममध्ये गांजाचा नशा करत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ पोलीसांनी शनिवारी २४ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अशोक वामन राऊत वय ५६ रा. गांधी नगर, भुसावळ याच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजाची पुडी व नशा करण्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल हर्षल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कांतीलाल केदारे हे करीत आहे.