धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्ती जागीच ठार


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ एका धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी ५० वर्षीय पुरूषाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २४ मे रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे खंबा क्रमांक (४४२/१८) जवळ शनिवारी २४ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अंदाजे ५० वर्षीय अनोळखी पुरूष हा रेल्वे रूळ ओलांडत असतांना अचानक धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर भुसावळ रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान मयताची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य, वस्तू मिळून आली नाही. मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.