
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात गॅसचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने एका तरूणाच्या घरावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता छापा टाकून चार गॅस सिलेंड, वजन काटा आणि गॅस भरण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रीक मोटार असा एकुण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात शेख अरबाज शेख अब्बाज वय २७ हा तरूण अवैधपणे गॅसचा काळा बाजार करत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शेख अरबाज याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरात अर्धवट भरलेले गॅसचे चार सिलेंडर, काटा आणि गॅस भरण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रीक मोटार असा एकुण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकणी पोहेकॉ प्रविण भालेराव यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुढील तपास पोउनि सचिन रणशेवरे करीत आहेत.



