म्हसावद येथे ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर धडक कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्सन्युज प्रतिनिधी । कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा ,विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाईकामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील श्सुरज जगताप कृषी विकास अधिकारी, विजय पवार मोहीम अधिकारी विकास बोरसे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक धीरज बडे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते .

कृषी विक्रेते यांनी जाता दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिलेला असून शेतकऱ्यांनी ज्यादादाराने विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव,कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी.

शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाच्या मागणी न करता विक्रेता यांच्याकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित BG 2 प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते.

शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात आले.

Protected Content