Home क्राईम जळगावात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगावात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एमआयडीसी पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रात्री ९.३० वाजता अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १७ वर्षीय मुलगी ही आपल्या मावशीकडे शिक्षणासाठी राहत आहे. ती नशिक येथील रहिवाशी आहे. १९ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. बेपत्ता झालेल्या मुलीचा शोधाशोध सुरू केला. परंतू ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या मावशीच्या खबरीवरून सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीच्या विरोधात  एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहे. 

 


Protected Content

Play sound