आठवडे बाजारात गुटखा विक्रेत्यावर कारवाई; 88 हजाराचा मुद्देमाल जप्त

 

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील ओम साई ट्रेडर्स दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित पान मसाला आणि तंबाखू असा एकूण 88 हजार 445 रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी शुक्रवार 5 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता दुकानदारावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील ओम साई ट्रेडर्स या दुकानावर शुक्रवारी 5 जुलै रोजी दुपारी 4 वाजता अन्न व औषध प्रशासनाचे विभागाने छापा टाकला या ठिकाणी दुकानातून सुगंधित पान मसाला गुटका आणि तंबाखू असे एकूण 88 हजार 445 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानदार विनयसिंग प्रल्हादसिंग पाटील (वय-39 रा. म्हाडा कॉलनी, हनुमान नगर, भुसावळ) यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी करीत आहे.

Protected Content