गांजाचा नशा करणाऱ्या चौघांवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर मंगळवारी २ जुलै रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात काही तरूण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीसांनी मंगळवारी २ जुलै रोजी रात्री ८ कारवाई केली. याठिकाणी चार जण गांचा नशा करतांना आढळून आले. याप्रकरणी पोलीसांनी गांजासह इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर व सुधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभाकर रमेश पाटील वय ४८ रा. कांचन नगर, अजय सुरेश सोनवणे वय २५ रा. लक्ष्मी नगर, अझर कुदुबोद्दिन शेख वय २७ रा. शाहू नगर आणि नरेश मांगीलाल विश्वकर्मा वय ३० रा. शिवाजी नगर, जळगाव यांच्या विरोधात रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन बडगुजर आणि पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.

Protected Content