आयएमआर महाविद्यालयात उद्योजकता दिनानिमित्त स्पर्धेंचे आयोजन

 

जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे या मुख्य उद्देशाने येत्या १९ ऑक्टोबर रोजी केसीई संचालित आयएमआर महाविद्यालयात उद्योजकता दिनानिमित्त ‘अंतर्गत बिझनेस प्लान’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत.

“उत्पादन प्रदर्शन आणि विक्री” यासाठी देखिल स्वतंत्र स्पर्धा आणि व्यवस्था करण्यात आली आहे. हि स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत्रात घेतली जाणार आहे. विविध महाविद्यालयांचे आणि परिसंस्थांचे संघ आयएमआर मध्ये संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांच्या वतीने आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व अभ्यासक्रमांसह इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी रोख बक्षीसे आणि ट्रॉफी विजेत्याला देण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकांसाठी 100 रु. प्रवेश फी आकारण्यात येत असून एका संघात जास्तीत जास्त 4 स्पर्धक असावे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदणी करण्यासाठी डॉ. अनुपमा चौधरी (मो.नं 9284260664), संदिप घोडके (मो.नं 9049774202), अनिलकुमार मार्थी (मो.नं 9975984433), ममता दहाड (मो.नं 9423488244) आणि विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद जोशी (मो.नं 8830092340, 7350089777), राणा ओजस्वनी (मो.नं 9373405345) यांच्याकडे नावे नोंदवावी असे आवाहन संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी केले आहे.

Protected Content