जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा गावातील भिलाटी भागात लोखंडी सुरा हातात घेवून फिरणाऱ्या अल्पवयीन मुलावर जळगाव तालुका पोलीसांनी रविवारी २ जून रोजी दुपारी ३.३० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा बेकायदेशीरपणे हातात लोखंडी सुरा घेवून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार रविवार २ जून रोजी दुपारी ३.३० वाजता पोलीसांनी कारवाई करत विधी संघर्षीत बालकावर कारवाई केली. त्यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला. त्याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे हे करीत आहे.