विद्यापीठातर्फे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने पूनर्परीक्षाचे नियोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या प्री पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेपासून वंचित राहिलेल्या अथवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ एप्रिल रोजी विद्यापीठात ऑनलाईन पध्दतीने पूनर्परीक्षा घेतली जाणार आहे.

प्री पीएचडी कोर्सवर्क पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. ४ व ५ मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थी इतर परीक्षांमुळे या कोर्सवर्क परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी अनुपस्थितीत राहिलेल्या आणि त्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पूनर्परीक्षा घेण्यात यावी अशी विनंती विद्यापीठाकडे करण्यात आली होती. आता ही पूनर्परीक्षा विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या इमारतीमध्ये असलेल्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात दि. १२ एप्रिल रोजी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या परीक्षेसाठी कोर्सवर्क परीक्षचे शुल्क रूपये १५०० भरणे आवश्यक आहे. त्यासाठी पेट-२०२१ च्या लॉगइनमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट-२०१९ च्या विद्यार्थ्यांना पेट-२०१९ च्या लॉगइनमध्ये लिंक उपलब्ध होईल. शुल्क भरल्यानंतर त्यांच्या लॉगइनमध्ये परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होईल. ज्यांनी तात्पुरते प्रवेश शुल्क भरलेले नाही त्यांनी तात्पुरते प्रवेश शुल्क देखील परीक्षेच्या किमान एक दिवस आधी भरणे आवश्यक आहे. अशी माहिती संशोधन विभागाकडून देण्यात आली. सर्व संशोधक मार्गदर्शक यांना पेपर ३ चे गुण विद्यापीठात सादर करण्याबाबत देण्यात आलेली दि. ३१ मार्चपर्यंतची मुदत ही दि. १७ एप्रिलपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. संशोधक मार्गदर्शकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे पेपर ३ चे गुण ऑनलाईन पध्दतीने ओयासिसच्या पोर्टलमधून पेट-२०२१ च्या लॉगइनमधून भरणे अनिवार्य आहे. जे विद्यार्थी पेट-२०१९ चे असतील त्यांच्यासाठी पेट-२०१९ चा लॉगइन वापरावा. कोर्सवर्क पेपर १ किंवा २ किंवा दोन्ही पेपर अनुत्तीर्ण असले अथवा अनुपस्थित असले तरी ही संशोधक मार्गदर्शकांनी पेपर ३ चे गुण देण्याची कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content