भुसावळातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात १५ वर्षीयअल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी फूस लावून कायदेशीर रखवालेतून तिचे अपहरण करून पसार झाला आहे.‍ पिडीत मुलीच्या नातेवाईकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती न मिळाल्याने अखेर सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरीश भोये करीत आहे.

Protected Content