अरे देवा ! जिल्ह्यात नव्याने १ हजार १८३ कोरोना रूग्णांची भर; जळगावात सर्वाधिक रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ हजार १८३ रूग्ण आढळून आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्यातील संसर्ग कायम वाढलेला दिसून येत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२७४, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१४३, अमळनेर-८८, चोपडा-१९५, पाचोरा-१५, भडगाव-१०, धरणगाव-६९, यावल-३२, एरंडोल-१२२, जामनेर-४१, रावेर-३६, पारोळा-४८, चाळीसगाव-२८, मुक्ताईनगर-४७, बोदवड-२१, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १ हजार १८३ बाधित आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात आजवर ८१ हजार ९८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६९ हजार ९७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. १० हजार ४५४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज तब्बत १३ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार ५३९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

Protected Content