जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतुक करणार्या चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धडक कारवाईची मोहिम निमखेडी शिवार, खेडी खुर्द शिवार, आव्हाणे फाटा परिसरात राबविण्यात आली. तालुका पोलीसांनी वाहने जप्त केली असून पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीत पाणी असतांना तसेच वाळूच्या एकाही गटाचा लिलाव झालेला नाही. तरी देखील वाळू वाहतूक करणारे व्यावसायिक जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची अवैध वाहतुक मोठ्या प्रमाणावर करीत आहे. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून निमखेडीसह खेडी खु. मार्गे वाळूची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मिळाली. पोलीस पथकाला कारवाईच्या सुचना दिल्यानंतर पथकाने दुपारी २ वाजता निमखेडी शिवारातून खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंपाजवळी हॉटेल क्रिष्णा व आव्हाणे फाट्याकडून जळगावकडे तर खेडी खु. शिवारातून विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळूची अवैध वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. त्यांच्याकडे परवाना असल्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुठलाही वाळूवाहतुकीचा परवाना नव्हता. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक राजेंद्र लोटू सोनवणे (वय-३०, रा. खेडी खुर्द पोस्ट कढोली ता. एरंडोल), गणेश दरबाज कोळी (वय-२९, रा. पाळधी बु. कोळीवडा ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.