कुसुंबा येथे अवैधरित्या असलेल्या खैरचा लाकडावर वन विभागाची कारवाई

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | 23 सप्टेंबर रोजी विभागीय वनाधिकारी दक्षता यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी गस्तीपथक जळगाव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जळगाव यांच्यासह गस्तीपथक व वनविभाग रेंज कर्मचारी यांनी जळगाव शहर नजीक कुसुंबा येथे खुल्या असलेल्या खैर जातीच्या लाकूड साठ्यावर वन विभागाने कारवाई केली असून त्यामध्ये खैरप्रजातीचा लाकूड माल एकूण नग 680 हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे 1,75,000/- इतकी आहे.

सदरचा अवैध खैर साठा हा अक्कलकुवा जि. नंदुरबार येथील खैर व्यापारी हसरत खान साहेब खान कुरेशी उर्फ बाबा कुरेशी यांचा असल्याची खात्री पटल्याने त्यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई निनू सोमराज वनसंरक्षक धुळे, उपवनसंरक्षक जळगाव प्रवीण ए., विभागीय वन अधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक जळगाव, उमेश बिराजदार च्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी गस्तीपथक जळगाव,  नितीन बोरकर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जळगाव, संदीप पाटील वनपाल जळगाव, योगेश दीक्षित गस्तीपथक, भरत पवार वनपाल विटनेर, भागवत तेली वनरक्षक गस्तीपथक, दीपक पाटील वनरक्षक, हरीश थोरात वनरक्षक, अजय रायसिंग वनरक्षक, विलास पाटील वनरक्षक, गुलाब सिंह ठाकरे वनरक्षक यांच्या मदतीने करण्यात आली.

Protected Content