भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ येथे रेल्वे विभागाने विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर दंडांत्मक कारवाई करणाऱ्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या कारवाईत ८६३ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्या जवळून १ लाख २२ हजार ६०० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
भुसावळ रेल्वे विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने मास्क न घातलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी दंडात्मक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून १९ एप्रिल ते ४ मे दरम्यान ८६३ रेल्वे प्रवाश्यांना दंड आकारण्यात असून एक लाख २२ हजार ६०० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. प्रवाशांना दंड पावतीसोबत फेस मास्कदेखील विनाशुल्क देण्यात आला. कोरोना साथीच्या आजारामुळे सद्य परीस्थितीशी सामना करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून भुसावळ विभागाने रेल्वे प्रवाशांना स्टेशन परीसर आणि रेल्वे प्रवासादरम्यान फेस मास्क घालावा तसेच स्टेशन परीसर आणि गाड्यांमध्ये थुंकू नये, स्वच्छता करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.