जळगावात गावठी दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर आणि कानळदार रोडवर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलीसांनी कारवाई केली असून दोघांकडून २ हजार २५० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली आहे. शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परिसरात लाकुडपेठ येथे सॉ मिलच्या बाजूला आणि कानळदा रोडवरील के.सी.पार्कच्या शेजारी दोन जण बेकायदेशीर गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार, पोहेकॉ भरत पाटील, पोहेकॉ संजय झाल्टे, पो.कॉ. ज्ञानेश्वर उन्हाळे आणि होमगार्ड महेश कोळी यांनी आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरात पहिली कारवाई केली. संशयित आरोपी दत्तू गणपत भाई (वय-४४) रा. धनाजी काळे नगर, शिवाजी नगर यांचा ताब्यात घेतले. त्याच्याजवळील १ हजार रूपये किंमतीची गावठी दारू हस्तगत केली. तर दुसऱ्या कारवाईत संशयित आरोपी बबन दशरथ आढाळे (वय-६०) रा. गेंदालाल मिल याचा अटक करून त्यांच्या ताब्यातील १ हजार २५० रूपये किंमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Protected Content