जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बेंडाळे पेट्रोल पंपाच्या मागील रिक्षा स्टॉपजवळ प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांविरोधात कारवाई करण्यात आले आहे. त्यांच्याकडून नायलॉनचा मांजा जप्त केला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील बेंडाळे पेट्रोल पंपाजवळच्या रिक्षा स्टॉपजवळ काहीजण बेकायदेशीररित्या नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे यांना मिळाले. त्यानुसार त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यातील शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शनिवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी अमित सुरेश पीडीयार (वय-३३) आणि राहुल ओम प्रकाश डाबी वय-२९ रा. रचना कॉलनी जळगाव यांच्याकडून ८ हजार रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा हस्तगत केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश गवळी हे करीत आहे.