जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या सहा जणांवर आज शुक्रवारी सकाळी पोलीसांनी धडक कारवाई करत ९१ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सिंधी कॉलनी परिसरातील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करणे आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनानुसार एमआयडीसी पोलीसांनी आज शुक्रवार ७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत अवैधरित्या दारू तयार करणे आणि विक्री करणाऱ्या लक्ष्मी चंदन मलके रा. रामेश्वर कॉलनी, माधवी प्रतिक गारूगे रा. तांबापुरा, गौरी संजय नेतलेकर रा. जाखनीनगर कंजरवाडा, नितीने विजू नेतलेकर रा. जाखनी नगर कंजरवाडा, लक्ष्मी संजय अभंगे रा. संजय गांधी नगर कंजरवाडा आणि कैलास रविंद्र बडे रा. जगवाणीनगर या सहा जणांवर कारवाई केली. त्याच्या ताब्यातील ९१ हजार ७२० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोउनि रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. गणेश शिरसाळे, सुनिल सोनार, मिलींद सोनवणे, चेतन सोनवणे, इम्रान सैय्यद, असीम तडवी, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, साई मुंढे, इम्रान बेग, होमगार्ड करण वंजारी शिवदास कळसकर यांनी कारवाई केली.