


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील डी.एस. मैदान येथील झाडाच्या आडोश्याला चिलममध्ये गांजाचा नशा करतांना एकावर भुसावळ शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील डी.एस. मैदानातील झुडूपाच्या आडोश्यात काहीजण चिलममध्ये गांजाचा नशा करत आल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या आदेशानुसार पथकाने शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत शैलेश राजाराम नरवाडे वय ३० रा. कुभारवाडा भुसावळ याला रंगेहात पकडले. याप्रकरणी पोहेकॉ भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद हे करीत आहे.



