जळगाव प्रतिनिधी । शहरातील महावीर कृषी केंद्रावर बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याचे आजच्या छाप्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातल्या विसनजी नगर भागातील ललीत वर्धमान लोढा यांच्या मालकीच्या महावीर कृषी केंद्रात बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती कृषी खात्याला मिळाली होती. यातच आज आयपी इनव्हेस्टीगेशन कंपनीच्या प्रतिनिधीने एक बनावट वाण खरेदी केल्यानंतर तालुका कृषी अधिकार्यांनी आज या दुकानावर छापा टाकून बियाणे जप्त केले आहेत. या कारवाईनंतर संबंधीत दुकानातील बियाण्यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी सचिन बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एम. शिंपी, कृषी पर्यवेक्षक डी.वाय. महाले व त्यांच्या सहकार्यांनी केली.