जळगावात उमेदवारीचा सस्पेन्स कायम

download 2 1

भडगाव (सागर महाजन) । जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार निवडीचा सस्पेन्स कायम आहे. राष्ट्रवादीने मात्र उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भाजपाने आपल्या उमेदवारांची अद्याप चाचपणीच सुरू ठेवली असून केंद्रीय बोर्ड लवकरच या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. यात प्रदेश पातळी वरून केंद्रीय समितीकडे किती आणि कोणाची नावे गेली आहेत हे पक्षांतर्गत गुपित आहे मात्र तरी देखील अनेक इकचुक ब्रेकिंग न्युज च्या नावे आपलीच उमेदवारीसाठी केंद्रीय पातळीवर शिफारस झाल्याचे संदेश पसरवत सोशल मेडियाच्या माध्यमातून वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे रोजच्या या अश्या ब्रेकिंग न्युज वर जनतेचा विश्वास बसत नसून पक्षीय पातळीवरच अधिकृत घोषणा होइ पर्यंत हा घोळ कायम राहणार आहे.

सद्यस्थितीला विद्यमान खासदार ए.टी. पाटील, उदय वाघ, डॉ.संजीव पाटील, करण पवार, आ.उन्मेष पाटील, डॉ.अस्मिता पाटील यासह अशी डझनभर नावे समोर आली आहेत. मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल असल्याने पक्षाला मराठा उमेद्वारालाच संधी देणे क्रमप्राप्त असणार आहे यात गुलाबराव देवकर यांच्या सारख्या तगड्या उमेद्वारासमोर टिकाव धरेल असा उमेदवार भाजपाला द्यावा लागणार आहे. या कसोटीवर विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे नाव अंतिम झाल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत मात्र त्यांच्या संदर्भात विरोधकांना टीकेची आयती संधी मिळू नये म्हणून त्यांचे नाव कदाचित मागे पडू शकते तर करण पवार हे गुलाबराव देवकर यांच्या तुलनेने परिपक्व भासत नसल्याचा अनेक कार्यकर्त्यांचा कयास आहे तर प्रकाश पाटील आणि तत्सम नवख्या उमेदवारांना पक्षाने संधी दिल्यास निष्ठवंत नाराजीची पक्षापुढे भीती आहे. रावेर मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने पुन्हा जळगाव मतदारसंघात पक्ष महिला उमेदवार देणार नाही असे काही पदाधिकारी खाजगीत बोलत आहेत. त्यामुळे आ.स्मिता वाघ आणि डॉ.अस्मिता पाटील या कसोटीवर पिछाडीवर राहण्याचे संकेत मिळत असल्याने जेष्ठतेच्या मुद्दा विचारात घेतल्यास आपल्याला पक्षाने संधी द्यावी असा आशावाद डॉ.संजीव पाटील हे बाळगून आहेत.

याबाबत लाईव्ह टेंडस न्युज ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण पक्षाकडे उमेदकारीची मागणी केली असल्याचे स्पष्ट केले. डॉ.संजीव पाटील हे उच्च शिक्षित असून गत 25 वर्षांपासून भाजपाचे काम करत आहेत.जिल्हा दूध संघाचे सध्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.शिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक शैक्षणिक कामे सातत्याने करत असल्याने त्यांनी देखील आपल्या नावाचा पर्याय ठेवला असून सर्व मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून आपल्याला उमेदवारी मिळाल्यास संधीचे सोने करू असा आशावाद त्यांनी व्यक्त करत माझे सर्व क्षेत्रात काम असल्याने आपणास संधी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

Add Comment

Protected Content