अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्यांवर कारवाई


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नसरवानजी फाईल भागात रिक्षात अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्यावर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या अंतर्गत शिवाजीनगर भागातील नसरवानजी फाईल भागात अवैधरित्या रिक्षांमध्ये गॅस भरण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती.

यानुसार पोलिस व महसूल खात्याच्या पथकाने आज शनिवार दिनांक ८ रोजी पहाटे येथे पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात एमएच 19 व्ही 0638 क्रमांकाच्या रिक्षात अवैध प्रकारे गॅस भरणारा व्यक्ती व रिक्षाचालक यांना अटक करण्यात आली. यासोबत गॅस सिलेंडर, वजन-काटा, इलेक्ट्रीक मोटर आदी साहित््या देखील जप्त करण्यात आले. यात रिक्षा चालक शेख नौशाद शेख नजीर ( वय ३१, रा. नसरवानजी फाईल भुसावळ ) आणि रिक्षाचालक निलेश सुरेश चौधरी ( वय ४१, रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी दोन्ही संशयितांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात अत्यावश्यक वस्तू कायदा ३ आणि ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक शरद बागुल, हवालदार कमलाकर बागुल, गोपाळ गव्हाळे व संघपाल तायडे यांच्यासह पुरवठा निरिक्षक रोशना रेवतकर आणि दोन पंच कोतवाल जितेश उत्तम चौधरी व महसूल सहाय्यक दीपक शांताराम बावस्कर यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

दरम्यान, अवैधरित्या गॅस फिलींग करण्याचा गैरप्रकार हा अनेक ठिकाणी घडत असून याच्या विरोधात धडक कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.