Home क्राईम हरियाणातील चेक बाऊन्सप्रकरणी पाचोरा येथील आरोपी ताब्यात

हरियाणातील चेक बाऊन्सप्रकरणी पाचोरा येथील आरोपी ताब्यात


Bounced Check
Bounced Check

पाचोरा, प्रतिनिधी | हरियाणातील फरीदाबाद येथील पोलीस स्टेशनमध्ये २०१६ साली चेक बाऊन्स संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला येथील पोलिसांनी आज (दि.२५) ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही कामगिरी पोलीस नाईक राहुल सोनवणे व किरण पाटील यांनी केली आहे.

 

अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी नारायणसिंग राजपूत रा.अरिहंत नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांच्यावर चेक बाऊन्स संदर्भात गुन्हा दाखल झाला असता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज हरियाणा पोलिसांचे एक पथक शहरात आले होते. येथील पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक राहुल सोनवणे व किरण पाटील यांनी तत्काळ शोध घेऊन संबंधिताला ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.


Protected Content

Play sound