रेयान जहागिरदार मारहाणप्रकरणी सात संशयितांना कोठडी

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । एमआयएमचे महानगराध्यक्ष रेयान जहागिरदार यांच्यासह सहा जणांना पाच ते सहा जणांनी मारहाण करत धारदार शस्त्राने मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या सात जणांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रजा कॉलनीतील रहिवासी खालीद शेख शब्बीर हे स्मशानभूमिजवळ रात्री 9 वाजता पादत्राणे विकत असतांना त्यांना संशयित आरोपी लोकेश विलास अत्तरदे, मोहन ईश्वर पाटील, हर्षल धर्मरत्न सोनावणे, विजय गणेश कांडेलकर, राहुल संजय पवार, सागर उर्फ दिनेश प्रभाकर दुसाने व अन्य एक जण असे एकूण सात तरूणांची फुकटात बुट मागितले. याला नकार दिल्यानंतर अचानक पाच जणांनी खालीद यांना मारहाण करण्यात आली. ही घटना संपत नाही तोच यानंतर नेरी नाक्यावरील चिकू विक्रेते अबिद बिस्मिल्ला बागवान (वय- ३८) धंदा – फ्रुट विक्री, रा. कासमवाडी जळगाव हा चिकु विक्री करीत असतांना संशयितांनी न विचारता चिकु घेऊन जात असतांन हटकल्याने रागात येवून पाचही संशयितांनी यांच्यावरही हल्ला चढविला. शिवीगाळ, चापट बुक्यांनी मारहाण करून कपाळावर, कानावर, छातीवर, पोटावर चेहऱ्यावर मारून गंभीर दुखापत केली व ‘तेरेको हम छोडेंगे नही’ अशी धमकी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतक्यात तेथून जात असणारे एमआयएम पक्षाचे महानगराध्यक्ष रैयान जहागीरदार यांच्यावरही या तरूणांनी हल्ला चढविला. यासोबत रिझवान बागवान आणि एमआयएमचे तालुकाध्यक्ष जिया बागवान यांनाही मारहाण करण्यात आली. यात हे सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी शनी पेठ पोलीसात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सहा जणांना अटक करण्यात आले असून पाचही जणांना पुढील चौकशीसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज सातही संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content