Home Uncategorized नवीन बी.जे.मार्केट परिसरात अनोळखी वृध्द महिलेचा आकस्मात मृत्यू

नवीन बी.जे.मार्केट परिसरात अनोळखी वृध्द महिलेचा आकस्मात मृत्यू


जळगाव प्रतिनिधी । इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या समोर एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय वयोवृध्द महिलेचा मृतदेह आज शनिवारी १७ जुलै रोजी सकाळी आढळून आला आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील नविन बी.जे. मार्केट परिसरातील इंडीयन रेडक्रॉस सोसायटीसमोर एका ६० ते ६५ वर्षीय वयोवृध्द महिला आज शनिवार १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मयतस्थितीत आढळून आला. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी यांना मयतस्थितीत आढळून आल्याने त्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील आणि पो.ना. संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी मयत वृध्द महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. 


Protected Content

Play sound