मिनीडोअर पलटी ; एक प्रवाशी ठार

a5f73490 bb6d 4dcd a143 4d12d5f84c83 1

 

यावल (प्रतिनीधी) येथील यावल-भुसावळ राज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी मिनीडोअर आज सकाळी टायर फुटल्यामुळे पलटी झाले. या अपघातात अपघातात एक प्रवाशी जागीच ठार झाला असून अन्य प्रवासी जखमी झाले आहेत.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास यावल येथील राहणार साबीर अय्युब खाटीक (वय ४१) हे नाशिकहून येणाऱ्या आपल्या मोठया मुलीला घेण्यासाठी प्रवासी वाहतुक करणाऱ्या मिनीडोअर (क्रमांक एमएच १९, ७०६८) ने भुसावळ रेल्वे स्थानकावर जात होते. निमगाव टेंभी गावाजवळ बंद पडलेल्या व्यंकटेश मिलच्या खुल्या जागेसमोरील वळणावर अचानक वाहनाचे टायर फुटले. या अपघातात साबीर खाटीक हे जागीच ठार झाले. तर अन्य काही प्रवाशी देखील जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत कळताच ग्रामीण रुग्णालयात नागरीकांनी एकच गर्दी केली होती.

 

312ffb94 8cb6 418b 946a 635ba1e5e875

 

Protected Content