दीपनगर जवळ उड्डाण पुलावर दोन ट्रक एकमेकांना धडकल्या

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथून जाणार्‍या महामार्गावरील उड्डाण पुलावर रात्री उशीरा दोन ट्रकचा समोरा-समोर अपघात झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत.

दीपनगर जवळ असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास एपी ३९ टिएम ६३१८ आणि डब्ल्यूबी ११ ई ४३०२ या क्रमांकाच्या दोन ट्रकची एकमेकांना धडक झाली. यात दोन्ही वाहनचालकांसह अजून एक असे तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच फेकरी, दीपकनगर तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

दीपनगर जवळच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या दुसर्‍या भागाचे काम सुरू असल्याने येथे महामार्ग निमुळता झालेला आहे. परिणामी येथे अनेक लहानमोठे अपघात होत असतात. यामुळे येथील रेल्वेचा पुल हा लवकरात लवकर तयार व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या अपघातातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Protected Content