Home क्राईम धरणगावनजीक दोन दुचाकींचा अपघात; दोघे स्वार ठार

धरणगावनजीक दोन दुचाकींचा अपघात; दोघे स्वार ठार

0
112


धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव न्यायालयाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला असून यात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, मालखेडा (ता. एरंडोल) येथील नाना तुकाराम सोनवणे (वय ४१) हे अमळनेरकडे जात होते. तर धरणगाव येथील कासार गल्लीत राहणारे सागर नाना पाटील (वय ३७) हे अमळनेरकडून येत होते. या दोन्ही दुचाकींची येथील न्यायालयासमोर धडक झाली. यात नाना तुकाराम सोनवणे हे जागीच ठार झाले. तर दुसर्‍या दुचाकीवरील सागर पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. हा भीषण अपघात सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला.


Protected Content

Play sound