जामनेर भानूदास चव्हाण । राज्यभरातील एसटी महामंडळ राज्य शासनात विलगीकरण करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहे यामुळे राज्य सरकारने ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली केली असून या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी जामनेर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळ खाजगीकरण असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पगार दिला जात नाही. कोणताही बोनस मिळत नाही यामुळे राज्यभरातील अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या परिवारा वरून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण (सामावून) करण्यात यावे. त्याचबरोबर विविध मागण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्य सरकारने राज्यातील सुमारे 376 कर्मचाऱ्यांना निलंबन केले आहे. बरोबर मुंबई येथे मोर्चाला जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामनेर येथील नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर व कुंभार अप्पा यांना जामनेर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे. बससेवा राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे जर असे झाले नाही तर एसटी कर्मचारी हे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतांना जामनेर आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणासुदीच्या कालावधीत एसटी बस सेवा बंद असल्याकारणामुळे खाजगी वाहन प्रवाशांकडून अव्वाच्यासव्वा भाडे घेत असून यामुळे मोठा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. किमान आतातरी राज्य शासनाने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांचे मागण्या मान्य करून एसटी बससेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.